Type Here to Get Search Results !

Showing posts from January, 2024Show all

उरणमधील भोईर कुटुंबियांचे कुलदैवत जेजुरी भेटीचा सोहळा उत्साहात संपन्न. उरण मधील कोट गाव व पाणजे गावा मधील भोईर कुटुंबिय दिनांक २६ जानेवारी शुक्रवार ते २८ जानेवारी रविवार या कालावधीत भोईर कुटुंबियांचे कुलदैवत घेऊन प्रथम महडच्या श्री वरदविनायकाचे दर्शन घेऊन कारर्ल्याची आई श्री एकवीरा देवीच्या पायथा मंदिरात कुलदैवत भेटवून श्री क्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन जेजुरी गडावर पहाटे श्री मल्हार मार्तंड खंडोबाचे दर्शन, अभिषेक घालून जुन्या कडेपठारावरील मल्हार मार्तंडाचे दर्शन घेऊन गडावरून खाली आल्यावर अंबाबाई मातेचा व खंडोबा देवाचा गोंधळ व जागरण घालण्यात आला. यावेळी भोईर कुटुंबियांचे सर्व सदस्य मोठ्या भक्तीभावाने या सोहळ्यात सहभागी झाले होते. भोईर महिलां भगिनींनी पारंपरिक गीते व नृत्य सादर केले. सर्व धार्मिक विधी उरकल्यानंतर तांदुळाच्या पिठाच्या गोड घाऱ्या व तिखट जेवणाचा प्रसाद म्हणून सर्व कुटुंबियांनी आस्वाद घेतला. या देवदर्शनासाठी दोन लक्झरी बस आणि तीन चार चाकी वाहनांचे आयोजन करण्यात आले होते जवळपास भोईर कुटुंबातील १०० लोकांनी या देव दर्शनाचा लाभ घेतला सर्व प्रवास, धार्मिक विधी, व इतर काही जेजुरी दर्शन सोहळ्यातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तसेच हा सोहळा भक्तीमय असला तरीही आनंदी व बहारदार होण्यासाठी भोईर कुटुंबियांच्या महिला व पुरुष सदस्यांनी मेहनत घेतली.

इंडियन ऑइल व्हेंचर लि. नवघर टर्मिनल कंपनी च्या वतीने पागोटे ग्रामपंचायतीस कचराकुंडी भेट दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी पागोटे ग्रामपंचायतीस इंडियन ऑइल व्हेंचर लि.कंपनी कडून गावातील कचऱ्याचे व्यवस्थीत साठवणूक होण्यासाठी गावात २४० लिटरच्या ५० कचराकुंड्या (डजबीन) भेट देण्यात आल्या. यावेळी इंडियन ऑइल व्हेंचर लि. कंपनीचे अधिकारी संदिप काळे (एच.आर.मॅनेजर), दिपक नाईक (मेन्टेनन्स मॅनेजर), प्रफ्फुल म्हात्रे (असोसिएट मॅनेजर) हे उपस्थित होते. पागोटे ग्रामपंचायत सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सतीश पाटील, सदस्य सुजीत तांडेल, अधिराज पाटील, मयुर पाटील, सदस्यां प्राजक्ता पाटील,करिश्मा पाटील, सोनाली भोईर, सुनीता पाटील, समृध्दी तांडेल ग्राम सेविका अनिता म्हात्रे, पागोटे , गावचे अध्यक्ष प्रकाश भोईर, व त्यांची टिम, गावातील जेष्ठ नागरिक मनोहर पाटील, रमेश पाटील, महेश पाटील, डि. के. पाटील, दिपक पाटील, सदानंद पाटील हे उपस्थित होते. गावासाठी कचऱ्याचे योग्य ठिकाणी नियोजन होण्यासाठी गेले ३ते ४ महिने इंडियन ऑइल व्हेंचर लि. कंपनीच्या असोसिएट मॅनेजर प्रफुल्ल म्हात्रे व पागोटे गावचे ग्रामस्थ हेमंत वासुदेव पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे गावातील कचऱ्याची साठवणूक आता कंपनीने दिलेल्या या कचराकुंडीत करता येईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतीश पाटील यांच्या सुंदर वाणीने झाले तर गावच्या ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्याचे काम गावचे जेष्ठ नागरिक मुकुंद पाटील गुरुजी यांनी केले. पागोटे गावात झालेल्या या कचऱ्याचे योग्य नियोजनाबद्दल गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Load More That is All