Type Here to Get Search Results !

रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई आयोजित "ये शाम मस्तानी" संगीत रजनीला उत्स्फूर्त प्रतिसाद

 रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई आयोजित "ये शाम मस्तानी" संगीत रजनीला उत्स्फूर्त प्रतिसाद


(प्रतिनिधी /नवी मुंबई) :- रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबई यांच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. सामाजिक कार्याकरिता लागणारा निधी हा जनमानसातून उभा व्हावा या हेतूने आर डी बर्मन यांच्या स्मृतींना उजाळा देत शुक्रवारी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे "ये शाम मस्तानी" या संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



या कार्यक्रमाला नवी मुंबई संगीत प्रेमी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आपल्या सुमधुर आवाजातून गायक अनिल बाजपेयी, अलोक काटधरे, राणा चॅटर्जी, प्रीती वारियर, मनीषा जांबोटकर व किशोर पारशार या सर्व गायकांनी पंचम दा यांनी संगीतबद्ध केलेली गाणी गाऊन कार्यक्रमात रंगत आणली.


रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबईच्या अध्यक्षा रोटरियन शालिनी कांबळे यांच्या पुढाकाराने हा संगीतमय कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास यशस्वी करण्याकरिता रोटरीयन जय कारिया ( प्रोजेक्ट चेअर), रोटरीयन मिलन चांडक (क्लब सेक्रेटरी) माजी क्लब प्रथम अध्यक्ष रोटरीयन गौरव कथुरिया, माजी अध्यक्ष रोटरीयन प्रसन्न कर्णिक, रोटरीयन जगदीश पिषारोडी,रोटरीयन केदार तेंडुलकर, रोटरीयन डॉ. कनुप्रिया ,रोटरीयन महेश कुंभार व रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी नवी मुंबईच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.


या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्याकरिता रोटरीयन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मिलिंद कुलकर्णी, फर्स्ट लेडी माधवी कुलकर्णी, माजी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त आयएएस विजय नाहटा, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, आयपीडीजी कैलास जेठाणी, कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक दीपक डहाणूकर (लाईक ऍज मी सलोन चे संचालक), प्राना ग्रुपजच्या संचालिका प्राची नरेंद्र पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. निधी उभारणी करिता आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला रोटरीयन , प्रायोजक. लाईक ऍज मी सलोन, प्राना ग्रुपज , के. हेअर स्टुडिओ , जे जे सि नवी मुंबई, लाईफ केअर इन्वेस्टमेंट, लाईफ केअर हॉस्पिटल डॉक्टर अमरेंद्र चौधरी, अनघा पिआर अँड इव्हेंट्स व समाजातील दाते व सामान्य जनतेने सुद्धा मदत केली. रसिक प्रेक्षकांनी, जेष्ठ नागरिक, शिक्षक, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी, शाळेचे कर्मचारी या सर्वांनी मिळून कार्यक्रमात सहभाग घेऊन हा कार्यक्रम हाउसफुल्ल केला.

Post a Comment

0 Comments