ओ.एन.जी.सी.कंपनीच्या सौजन्याने श्री समर्थकृपा सखी स्वयं सहाय्यता संस्थेच्या वतीने गरीब, गरजूवंत महिलांना केले शिलाई मशिनचे वाटप.
दैनिक युवक आधार
तृप्ती भोईर /उरण प्रतिनिधी
अयोध्या नगरीत श्री राम प्रभूंच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पवित्र दिनाचे औचित्य साधुन,या शुभदिनी एक समाजोपयोगी कार्य पार पडले, ते म्हणजेओ. एन. जी.सी.कंपनीच्या सौजन्याने श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संगिताताई ढेरे यांच्या माध्यमातून गरीब गरजूवंत व आदिवासीं महिला भगिनींना शिवणकाम करण्यासाठीच्या नवीन शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
गृहिणी म्हणून अनेक भूमिका निभावून दशभुजेच्या शक्तीने काम करणाऱ्या आधुनिक युगातल्या माझ्या सावित्रीच्या लेकींनी आपल्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं राहून स्वाभिमानाने समाजात आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करावं आणि त्यांच्या अंगी असणाऱ्या कला गुणांना वाव मिळावा व त्यांच्यातील अंगभूत गुणांना रोजगार मिळावा ह्याच उदात्त भावनेतून श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्थेच्या माध्यमातून एकूण १७ लाभार्थी गरीब गरजूवंत महीलां - भगिनीं करिता रोजगार निर्मिती करिता दिलेली ही अनोखी भेट ( सौगात ) हि भेट भविष्यात त्यांच्या अर्ध्या भाकरीचा प्रश्न सोडविण्यासाठी नक्कीच उपयोगात येईल, त्यातून त्यांना जगण्याची प्रेरणा मिळेल म्हणूनच संस्थेच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.संस्थेच्या या कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
श्री राम प्रभूंच्या मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पावन पवित्र दिनाच्या निमित्ताने केलेल्या उद्बोधक कार्या बरोबरच आणखीन एक भक्ती निष्ठ आणि धार्मिक कार्य केले गेल ते म्हणजे "शिवराज युवा प्रतिष्ठान उरण" व "महाराष्ट्र नवनिर्माण सेना उरणच्या" माध्यमातून मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेश दादा ठाकूर यांच्या संकल्पनेतून "श्रीरामोत्सव" या मंगलदिनाचे दिवशी महाआरतीचे आयोजन देखील करण्यात आले होते. या दिनाचे निमित्ताने १९९२ रोजी महाराष्ट्रातून आणि खास करून उरण येथून अयोध्या नगरी येथे कारसेवेत सामील झालेल्या ५ कारसेवकांचा विशेष सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
ह्या प्रेरणादायी कार्यक्रमा करिता प्रमुख मान्यवर उपस्थिती लाभली होती ती केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर, मनसे रायगड जिल्हा अध्यक्ष संदेशदादा ठाकूर श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्थेच्या संस्थापिका संगिता ढेरे, सचिन ढेरे .कारसेवक कैलाश शिसोदिया,निलेश भोईर,नरेश भोईर ,विजय( बंटी ) शेडगे, सचिन पाठारे सोबतच आगरी, कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्थेचे उरण तालुका सचिव अनिल घरत श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्थेच्या सचिव कविता म्हात्रे सहसचिव अभाया म्हात्रे,पूजा प्रसादे,वैदेही वैवडे,मंजू कुमार, मीना रावल,अनघा ठाकूर, तृप्ती भोईर, रश्मी तांबे, विशाखा म्हात्रे सुप्रिया सरफरे,मनसे उरण तालुका पदाधिकारी,सदस्य व लाभार्थी महिला भगिनीच्या उपस्थितीत हा बहारदार कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
Post a Comment
0 Comments