उरणमधील भोईर कुटुंबियांचे कुलदैवत जेजुरी भेटीचा सोहळा उत्साहात संपन्न.
उरण मधील कोट गाव व पाणजे गावा मधील भोईर कुटुंबिय दिनांक २६ जानेवारी शुक्रवार ते २८ जानेवारी रविवार या
कालावधीत भोईर कुटुंबियांचे कुलदैवत घेऊन प्रथम महडच्या श्री वरदविनायकाचे दर्शन घेऊन कारर्ल्याची आई श्री एकवीरा देवीच्या पायथा मंदिरात कुलदैवत भेटवून श्री क्षेत्र तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन जेजुरी गडावर पहाटे श्री मल्हार मार्तंड खंडोबाचे दर्शन, अभिषेक घालून जुन्या कडेपठारावरील मल्हार मार्तंडाचे दर्शन घेऊन गडावरून खाली आल्यावर अंबाबाई मातेचा व खंडोबा देवाचा गोंधळ व जागरण घालण्यात आला.
यावेळी भोईर कुटुंबियांचे सर्व सदस्य मोठ्या भक्तीभावाने या सोहळ्यात सहभागी झाले होते. भोईर महिलां भगिनींनी पारंपरिक गीते व नृत्य सादर केले. सर्व धार्मिक विधी उरकल्यानंतर तांदुळाच्या पिठाच्या गोड घाऱ्या व तिखट जेवणाचा प्रसाद म्हणून सर्व कुटुंबियांनी आस्वाद घेतला.
या देवदर्शनासाठी दोन लक्झरी बस आणि तीन चार चाकी वाहनांचे आयोजन करण्यात आले होते जवळपास भोईर कुटुंबातील १०० लोकांनी या देव दर्शनाचा लाभ घेतला सर्व प्रवास, धार्मिक विधी, व इतर काही जेजुरी दर्शन सोहळ्यातील जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तसेच हा सोहळा भक्तीमय असला तरीही आनंदी व बहारदार होण्यासाठी भोईर कुटुंबियांच्या महिला व पुरुष सदस्यांनी मेहनत घेतली.
Post a Comment
0 Comments