शिक्षण व रोजगारासाठी के.व्ही.एस ट्रस्ट चे महत्वपूर्ण कार्य.. मिस क्वीन ऑफ द वर्ल्ड अबोली कांबळे
दैनिक युवक युवक
सुरेश भोईर
२० जानेवारी रोजी पनवेल अदई येथील श्री.के.व्ही.शनमुगम मेमोरियल एज्युकेशन फाउंडेशन, महात्मा गांधी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज, शालेय वर्ष २०२२-२३ च्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्ताने वर्षभर राबवलेले शैक्षणिक उपक्रम सन्मानित व्यासपीठ व पालकांसमोर सादर करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्ष २०२३ मिस क्वीन ऑफ द वर्ल्ड विजेत्या अबोली कांबळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
स्नेहसंमेलनात गणेश पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करून शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून प्रतिमेस पुष्पहार व ज्ञानदीप प्रतीक म्हणून मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.
ह्यावेळी सन्मानित पाहुणे म्हणून व्यासपीठावर मनसे राज्य प्रवक्ता योगेश चिल्ले, आम आदमी पार्टी पनवेल महानगर जिल्हाध्यक्षा वैशाली कोळी,मनसे रोजगार स्वयंरोजगार विभाग जिल्हा संघटक डॉ. प्रशांत कदम, रिपाई नेते तुषार कांबळे उपस्थित होते.
श्री.के.व्ही.एस ट्रस्ट चेअरमन डॉ. क्रिष्णकुमार यांच्या प्रास्ताविक भाषणानंतर त्यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांचे नारळ, शॉल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत सत्कार व सन्मान करण्यात आले.
डॉ. प्रशांत कदम यांनी पालकांना आपल्या पाल्यांवर संस्काराचे मोहळ ठेवा, टेक्नॉलॉजीने देश घडत असतो तर संस्काराने देश टिकत असतो असे सांगत प्रशिक्षण ते स्वयंरोजगार बाबतीत के.व्ही.एस ट्रस्ट संस्थेच्या कार्याचे कौतुक केले.
आप जिल्हाध्यक्षा वैशाली कोळी यांनी सोशल मीडियाच्या जनजागृती बाबत विशेष माहिती देत " ऐका सारे गुरुजन.. आम्ही देतो तुम्हा वचन ...आम्ही चांगले बनू.. नवभारत घडवू या कवितेच्या माध्यमातून उपस्थितांची व विद्यार्थ्यांची मन जिंकली.
मनसे राज्य प्रवक्ता योगेश चिल्ले यांनी पतंग व दोरी या अतूट नात्याचं उदाहरण देत युवक युवतींना आपल्या जीवनात मनसोक्त आनंद लुटताना आपल्या आई-वडिलांच्या हातात आपल्या मर्यादेची दोर ठेवून देश, संस्कार ,संस्कृती व मर्यादा पाळून आयुष्य जगा व भविष्यात कुठलेही अडचण आल्यास मनसैनिकांना आठवण करा असे आधार वाक्य करत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
श्री.के.व्ही.एस ट्रस्ट दरवर्षी प्रमाणे समाजामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सन्मानित करत असते ह्या वर्षी हा सन्मान ,सत्कार ज्येष्ठ पत्रकार,समाजसेवक कांतीलाल कडू व रायगड भूषण, माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांना शाल ,पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला.
ज्येष्ठ पत्रकार कांतीलाल कडू यांनी हा समाज रत्न पुरस्कार केवळ माझा पुरस्कार नसून मी केलेल्या कामाचं, सन्मानित व्यासपीठ व आपल्या सर्वांच्या कार्याचे प्रतिनिधिक स्वरूपातल पुरस्कार व ऊर्जा म्हणून मी स्वीकार करतो असे सांगत . डॉ. क्रिष्णकुमार सर यांची
जन्मभूमी तमिळ व कर्मभूमी महाराष्ट्र असल्याने आपला मराठी माणूस व भाषा तमिळ सारख्या अनेक देश ,राज्यात पोहोचल्याच आम्हा सर्वांना अभिमान वाटतो .मराठी आपली मातृभाषा आहे तर हिंदी व इंग्लिश ज्ञानभाषा असल्याने सर्व भाषेंचा आदर सन्मान ठेवून संस्कार व संस्कृती कशी असावी ते प्रीमियर कॉलेज कार्यक्रमाच्या व्यासपीठावरच्या बॅनरवर झळकून दिसते .माझ्या सर्व सहकऱ्यांच्या वतीने सदैव शुभेच्छा ,सहकार्य आपल्या संस्थेला व सर्व ग्रामस्थांना असेल असे या निमित्ताने सांगत सर्व विद्यार्थी मित्रांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉक्टर शिवदास कांबळे यांनी पुरस्कार स्वीकारतांना म्हणाले की मला भावलेलं जे काम आहे ते काम अधिक दुप्पट वेगाने करण्याची मला जी संधी दिली त्या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो . शिक्षण संस्था चालवताना भौतिक सुविधांच्या अडचणी वर मात करत धारिष्ट दाखवून संस्थेने जे वैभव उभे केलं त्याबद्दल क्रिष्णकुमार सरांचे कौतुक केले. मिस क्वीन ऑफ द वर्ल्ड विजेत्या अबोली कांबळे यांच्या आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विशेष कौतुक करत त्यांना व विद्यार्थी ,शिक्षक व संस्थेला त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रिपाई नेते तुषार कांबळे यांनी शिक्षण ,प्रशिक्षण ,स्वयंरोजगार याचे महत्त्व समजून भविष्य घडवा याबाबत विद्यार्थ्यांना संदेश दिला
वार्षिक स्नेहसंमेलन निमित्ताने स्टुडन्ट ऑफ द इयर पुरस्काराने अनेक विद्यार्थ्यांचे तसेच स्वयंरोजगार निर्माण करत आर्थिक सक्षम आत्मनिर्भर करणाऱ्या महिलांचे डॉ. कृष्णकुमार व मान्यवरांच्या हस्ते सन्मान सत्कार करण्यात आले.
प्रमुख अतिथी मिस क्वीन ऑफ द वर्ल्ड विजेत्या अबोली कांबळे यांनी सन्मान ,सत्कार केल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त करत मी सुद्धा एक विद्यार्थी क्षेत्रात लास्ट बेंचर म्हणून शाळेत वावरली पण आई, वडील ,शिक्षक यांनी गुरु सारखं प्रोत्साहन, मार्गदर्शन देत माझ्यासारख्या साधारण मुलीला आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यासाठी पात्र बनवलं.
शिक्षणाने आपण देश ,समाज व अन्य व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करतो त्याच निमित्ताने येत्या एप्रिल महिन्यात भारता कडून शिक्षणाच्या जनजागृतीसाठी अमेरिकेसारख्या देशात हे कार्य करण्यासाठी दौऱ्यावर जाणार आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वाद व प्रेमाची साथ अशीच माझ्यासारख्या अनेक विद्यार्थी, महिलांच्या पाठीशी राहो अशी अपेक्षा करत मान्यवर व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे आभार मानले.
न्यूज केंद्र या वृत्तवाहिनीच्या तर्फे शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल संपादिका प्रेरणा गावंड यांच्या हस्ते श्री.के.व्ही.एस ट्रस्ट चेअरमन क्रिष्णकुमार सरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपली संगीत,नृत्यकला सादरीकरण करून मोठ्या उत्साहात वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम सामूहिक राष्ट्रगीत गाऊन पूर्ण केला.
श्री.के.व्ही.एस ट्रस्ट चेअरमन व व्यवस्थापन कमिटी ने विद्यार्थी , शिक्षकेतर, कर्मचारी वर्गाने अदई ग्रामपंचायत व ग्रामस्थ तसेच कुलगुरू संस्थापक संजयलीला बाळकृष्ण, माजी नगरसेवक अखतर कुरेशी, भाजपा नेते आरिफ शेख,साबीर शेख,जेष्ट पत्रकार सुनील कटेकर,एम जी ग्रुप कॅप्टन सुनील गाडेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अंग रक्षक राहुल वाघमोडे,उद्योजक प्रवीण शेंडे,अंजली मानापुरे ,दिव्या ट्युटोरियल संस्थापक सुरेश बोबडे व उपस्थित इतर मान्यवर पत्रकार व सहकारी वर्गाचे आभार मानले.
Post a Comment
0 Comments