Type Here to Get Search Results !

Showing posts from February, 2024Show all

"रस्ता सुरक्षा.. जीवन रक्षा" या उद्देशाने ३४ वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान वर्ष २०२४प्रतिनिधी/दि.०१ फेब्रुवारी २०२४/ पनवेल(साबीर शेख)ऑटो रिक्षा चालक, मालक यांच्या साठी रस्ता सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट अकॅडमी येथे घेण्यात आली शहराच्या संस्कृतीचा दर्शक असणारा प्रवासी वाहक हा प्रवासी सेवा सुरक्षित पुरविण्यासाठी कर्तव्यदक्ष असतो ,रस्ते नियम सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून समाजात संवेदनशील नागरिक घडावा ह्या उद्देशाने सामाजिक दैनंदिन जीवनात आपत्कालीन व्यवस्थेतील कर्तव्य पार पाडून कायदे व पर्यावरण, प्रदूषण अशा अनेक विषयांशी जोडलेला एक भागरिक्षा चालक व शहरातील नागरिक जीवन जगत असतो. अनेक सामाजिक प्रश्नांच्या अडचणीतून मार्ग काढत असताना मार्गदर्शन, सन्मान देत प्रबोधन व प्रशिक्षण हा उत्तम पर्याय म्हणून सातत्याने वर्ष भर प्रादेशिक परिवहन कार्यालय पनवेल तर्फे प्रात्यक्षिकाद्वारे जनजागृती, प्रचार ,प्रसार करीत विविध अभिनव उपक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात.यावेळी व्यासपीठावर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सचिन विधाते ,प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. शंकर माने, अग्निशामक विभाग कृष्णा राठोड ,शिव वाहतूक सेना अध्यक्ष दिलीप आमले,बाळासाहेब जगदाळे महाराष्ट्र राज्य पंचायत अध्यक्ष मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.यावेळी आपत्कालीन परिस्थिती अपघात ,दैनंदिन जीवनातील प्राथमिक उपचार पद्धत, व्यसन मुक्ती, अनुशासन, शिष्टाचार पाळत असलेला जवाबदार व्यक्ती सुसंस्कृत समाज घडवत असतो. म्हणून कर्तव्य पार पाडणाऱ्या अनेक वाहनचालकांचे सन्मान सत्कार करण्यात आले व वाहन परवाना साठी उमेदवारी दाखल करणाऱ्या चालकाच्या तोंडी परीक्षा चाचणी मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हेल्मेट व फुल पुष्प देऊन सन्मानित करण्यात आलेसहाय्यक मोटर वाहन निरीक्षक मोनिका साळुंके ,प्रदीप नांदकर, महेश माने, विशाल नाबदे ,सुयोग पाटील, तसेच विविध विभागातील रिक्षा चालक मालक वाहतूक संघटना पदाधिकारी व प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्या कार्यक्रमांमध्ये विशेष सहकार्य करण्यासाठी डिजिटल मोटर सर्विसेस व ज्योतिर्लिंग, स्वस्तिक, सनशाइन मोटर, दीपक, हेरंब, क्लासिक ,ए टू झेड मोटर ड्रायव्हिंग स्कूल व किशोर डिझाईनिंग यांचे विशेष आभार मानण्यात आले.

Load More That is All