Type Here to Get Search Results !

राज्यस्तरीय स्पर्धेत भरघोस यश मिळवून वीर तायक्वांदो असोसिएशन ऑफ पनवेलचे खेळाडू जयपूर, राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघांचे प्रतिनिधित्व करणार

राज्यस्तरीय स्पर्धेत भरघोस यश मिळवून वीर तायक्वांदो असोसिएशन ऑफ पनवेलचे खेळाडू जयपूर, राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघांचे प्रतिनिधित्व करणार

दैनिक युवक आधार
सुरेश भोईर 
 ३२ वी महाराष्ट्र राज्य तायक्वादो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मान्यतेने आयोजित नमो चषक दि. २७ जानेवारी ते २९ जानेवारी दरम्यान मीनाताई ठाकरे स्टेडियम नाशिक येथे पार पाडण्यात आली.

    सदर स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू जयपुर, राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय  स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेमध्ये वीर तायक्वादो असोसिएशन ऑफ पनवेलच्या सब-जुनिअर, कॅडेट, ज्युनियर अशा विविध गटातील खेळाडूंचा सहभाग असून अनुक्रमे आयुष अभिजीत कदम  सब - जुनिअर U -41  , मुस्तफा शेख  जूनियर  U -51, निहाल संजय भोईर  U -73  यांस सुवर्णपदक तसेच  खंतेश बाळाराम वासकर U - 48, श्रीजय हरेश्वर भगत U -69 यांनी रजत पदक व तेजल सुहास लाहोटी कॅडेट U -43 हिने कास्य पदक प्राप्त करून स्पर्धेत भरघोस यश संपादन केले. या स्पर्धेमध्ये अपूर्वा देसाई, हुसेन शेख,  आयान शेख यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले.
  
      राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे पदाधिकारी (TAM) अनिल झोडगे, आबा (अध्यक्ष), संदीप ओंबासे  (महासचिव), डॉ प्रसाद कुलकर्णी (खजिनदार), गफार पठाण (सीईओ) तसेच रायगड जिल्हा संघटनेच्या अध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा भगत, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष तसेच वीर तायक्वांदो असोसिएशनचे सेक्रेटरी संजय भोईर, श्री हरेश्वर भगत (अध्यक्ष),  हेमंत कोळी( उपाध्यक्ष), संदीप भगत( खजिनदार), निखिल भोईर, गणेश शिंदे, प्रशिक्षक, खेळाडू तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments